माहितीपट हे माध्यम कसल्याही कथानकाचा आधार न घेता, काल्पनिक गोष्टी टाळून त्याला जे म्हणायचं आहे ते थेट आपल्यासमोर पोहोचवतं. अमेरिकन निवडणूक प्रक्रिया मुळात इतकी किचकटआहे की त्यावरील सिनेमांपेक्षा माहितीपटांमधून ती अधिक चांगली कळू शकते.
भारतात संविधानाने सरसकट सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कुठला एक समाजघटक मतदान करायला मिळावं ह्यासाठी झगडतो आहे, हे आपल्याकडे फारसं कधी घडलं नाही. अमिरिकेत मात्र हा संघर्ष गेली साडेतीनशे वर्ष सुरूच आहे.