मुळात चित्रपट क्षेत्र, मालिका इ गोष्टी लोकांचं मनोरंजन करायला असतात ही बाब मान्य, त्यातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावण्याचे उद्दिष्ट ठेवणे ह्यातही काही गैर नाही. पण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की ह्या क्षेत्रांचा व्याप खूप मोठा आहे आणि इथून निघालेल्या गोष्टींचा समाजमनावर खूप परिणाम होत असतो.